पासवर्डच्या संरक्षणासाठी नव्या प्रणालीचा प्रस्ताव

password
ई-मेल अकाउंट, नेटबँकिंग व एटीएम, शेअर बाजाराचे ऑनलाइन व्यवहार इतकेच काय अगदी आपल्या हातात सतत असलेला मोबाइल बंद स्थितीतून पुन्हा सुरू करायचा असेल तरी पासवर्ड आवश्यक ठरतो. पासवर्ड लक्षात ठेवणे हे डोकेदुखीचे काम आहे. तसेच या पासवर्डचे संरक्षण करणे ही कठीण बाब आहे. कारण पासवर्ड चोरून पैसे पळवण्याचा उद्योग जगभरात सुरू आहे. त्यामुळे पासवर्डचे भक्कम संरक्षण करण्याची गरज आहे. नावीन्यपूर्ण पद्धतीने पासवर्डचे संरक्षण करण्याचे संशोधन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केले आहे. यामुळे हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण होऊ शकते.
अलाबामा विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण करण्याची नवीन पद्धती शोधून काढली आहे. पासवर्ड साठवून ठेवणा-या सव्‍‌र्हरवर हॅकर्सपासून अनेक हल्ले होत असते. ‘लिंक्डइन’ आणि ‘पेपाल’ या कंपन्यांना याचा अनुभव आला आहे, अशी माहिती कम्युटर अ‍ॅँड इन्फॉर्मेशन सायन्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नीतेश सक्सेना यांनी दिली.पासवर्ड लक्षात राहावा म्हणून अनेकजण तो अत्यंत सोप्या शब्दात लिहितात. हे पासवर्ड बहुतांशी सव्‍‌र्हरमध्ये साठवले असतात. हॅकर्स हे ऑनलाइन हल्ला करून किंवा सव्‍‌र्हरची कमकुवत सुरक्षा पाहून हल्ला करतात. त्यासाठी ते पासवर्ड डिक्शनरीचा वापर करतात.सध्या पासवर्डची खात्री पटवण्यासाठी ‘गुगल ऑथेंटिकेटर’ आणि ‘आरएसए सिक्युअर आयडी’ या दोन पद्धती वापरल्या जातात. पण, हॅकर्सच्या हल्ल्याप्रकरणी या पासवर्ड पद्धती निकालात निघाल्या आहेत. फेसबुक ही जगप्रसिद्ध सोशल साइट द्विस्तरीय पासवर्ड पद्धत वापरते.संशोधकांनी ४२ फॅक्टरची योजना आणली आहे. यात स्मार्टफोनवर सिक्युरिटी टोकन येते. संगणकाचे काम बॅँडविड्थवर अवलंबून असते. यात सुरक्षेचे १३ पर्याय दिले आहेत. नवीन पद्धतीत ‘पासवर्ड’ निर्मितीचे काम हे ‘अ‍ॅप्स’द्वारे केले जाते. संबंधिताने पासवर्ड टाइप केल्यानंतर स्मार्टफोनद्वारे स्वयंचलित पद्धतीने पासवर्ड निर्मितीचे काम केले जाते.सक्सेना यांच्याबरोबरच मलिहेह शिरवानियन, स्टानिस्लोव्ह जारेकी, नवीन नाथन यांनी पासवर्ड संरक्षणाच्या पद्धतीवर विस्तृत संशोधन केले. आमच्या प्रत्येक प्रस्तावामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था मिळू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven × 7 =