पुणे विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले’ यांचे नावः सरकारचा निर्णय

8770
मुंबई – पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा निर्णय आज, सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयाने राज्याच्या पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.
पुणे विद्यापीठाच्या सिनेटने यापूर्वी अशाप्रकारचा ठराव मंजूर करून राज्य सरकारकडे पाठवला होता. सरकारच्या जच्या निर्णयामुळे गेल्या तीन वर्षापासून होत असलेली नामकरणाची मागणी अखेर मान्य करण्यात आली आहे.
पुणे शहर ही शिक्षणाची पंढरी समजली जाते. त्यामुळे या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्याची मागणी विविध संघटना आणि व्यक्तींकडून होत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनीही अशी मागणी केली होती.
पुणे विद्यापीठाच्या धर्तीवर सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर यांचे तर जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याचा ठराव पास झाल्याने राज्याच्या पुरोगामी वर्तुळात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 + = eight