पुत्रांना घडविणाºया ‘माय’चा गौरव, माय माउली प्रतिष्ठानचा उपक्रम

यवतमाळ – आईच्या वात्सल्याची सर कुणालाही करता येत नाही. स्वत: उपाशी राहून आपल्या चिल्या पिल्यांच्या तोडात घास भरविणाºया मायच्या कर्तृत्वापुढे आभाळही ठेंगणे पडते. अशाच कष्ट उपसून विपरित परीस्थितीवर मात करून आपल्या पुत्रांना घडविणाºया मायमाउलींचा गौरव १० मे रोजी सायंकाळी ६ वाजता विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे. माय माउली प्रतिष्ठान हा उपक्रम राबवित असून यंदा तिसरे वर्ष आहे. माय माउली पुरस्कारासाठी विरमाता लक्ष्मी कुनगर, रंजना मुळतकर, शांता काळा, अडेला उपेवाड, कलावती पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. पाच हजार रुपये रोख, साडी, शाळ, श्रीफळ,सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
माय माउलींचा गौरव व्यसनमुक्तीसम्राट संत मधुकर खोडे महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आशा देशमुख राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार प्रा. न.मा.जोशी, डॉ. विजय कावलकर, अशोक कंचलवार, यू.डी.आगरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक माय माउलीचा जीवन संघर्ष माहितीपटातून दाखविण्यात येईल. गौरव सोहळ््यानंतर आई विषयावर व्यसनमुक्तीसम्राट खोडे महाराज यांचे संगीतमय प्रवचन होणार आहे. दोन महिन्यापूर्वी ‘माझी माय’ या विषयावर काव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या काव्य स्पर्धेचे बक्षीस वितरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.  या गौरव सोहळ््याला यवतमाळकर जनतेने उपस्थित रहावे, असे आवाहन आनंद कसंबे, मिलिंद देशपांडे, प्रवीण कापर्तीवार, प्रकाश आंबिलकर, प्रा. सलिम चव्हाण, मंगेश देशपांडे, नरेश उन्हाळे, ठोकळ, जीवन लाभसेटवार आदींनी केले आहे.
सत्कारमूर्तींचा परिचय
विरमाता लिलाबाई कुनगर नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा येथील रहिवासी असून शहिद किशोर कुनगर यांच्या मातोश्री आहे. रंजना मुळतकर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील आहे. त्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करून आपल्या मुलांना घडविले. मुलगा डॉक्टर तर मुलगी इंजिनिअर आहे. शांता काळे ह्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील असून जीवनरुपी अग्निपरीक्षेतून मुलगा ज्ञानेश्वरला सीए केले. उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील अडेला उपेवाड येथील रहिवासी असून पतीच्या निधनानंतर वादळाशी झुंज देत मुलाला वाघीनीचे दूध पाजले.   मुलगा गणेश बीएसस्सी अ‍ॅग्री झाला आहे. कलावती पवार या वाशिम जिल्ह्यातील धानोरा भुसे येथील रहिवासी असून या माय माउलीने कष्ट उपसून मुलांना प्राध्यापक, शिक्षक केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 8 = fifteen