पुसदमध्ये आगीत सहा घरे जळून खाक

IMG-20150125-WA0109
पुसद , दि. २५  – शहरात दोन वेगवेगळ््या लागलेल्या आगीत सहा घरांची राखरांगोळी झाली. ही घटना काल दुपारी व रात्री दरम्यान घडली. शॉर्ट शर्कीटमुळे आग लागल्याचे सांगिल्या जात असून, सहा परिवार बेघर झाले आहे. आगीच्या तांडवात लाखो रुपयाचे नुकसान झाले.
घर जळून खाक झालेल्यांमध्ये पुंजाजी मोहकर (४५), छगन मोहकर (४५), बबन रामजी आढाव(४५),प्रभू रामजी आढाव, संतोष आढाव (३६),काळूराम मोहकर(५०), नासीर बेग (३५) यांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान दुबई परिसरात वीज प्रवाहातील दाबामुळे अचानक वायर, लाईट, टीव्हीमधून धूर निघायला लागता. बघता-बघता आग लागली. यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. जवळपास दहा घरात हा प्रकार घडला. तर रात्री १२ वाजताच्या सुमारास वसंतनगर भागातील बेंडकी परिसरात अचानक धूर निघताना दिसला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वी सहा घरांनी पेट घेतला होता. शहरात तणावपूर्ण शांतता असल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र ही आग शॉर्ट शर्कीटने लागल्याचे स्पष्ट झाले. रात्री आग लागलेल्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते. सर्व घरे लाकडी पाट्यांची असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घराघरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या पथकाला आगीची माहिती मिळाल्यानंतर ते उशीराच दाखल झाले. त्यातली बंब अर्धाच भरला असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 6 = thirty