यवतमाळ – पूर्व वैमनस्यातून धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना काल रात्री ९ वाजता दरम्यान महात्मा फुले (पाटीपुरा) चौकात घडली.अजय भीमराव बनसोड (२८)रा. सेजल रेसिडेंन्सी, अंबिकानगर यवतमाळ, असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ शोध मोहिम राबवून सचिन डोंगरे (२४), अनिकेत दिनेश वासनिक दोघेही रा. पाटीपुरा यांना अटक केली. तर रितेश बाविस्कर रा. अशोकनगर, राजा विशाल कोल्हे, नितीन धुळे रा. पाटीपुरा हे आरोपी फरार आहे.
या खूनप्रकरणाचा म्होरक्या रितेश हा पाटीपुºयात बल्ली नावाने प्रसिद्ध आहे. अजय व बल्लीमध्ये गेल्या काही महिन्यापूर्वी वाद झाला होता. तसेच खटके उडत होते. याचा वचपा काढण्यासाठी पाचही आरोपींनी अजयला संपविण्याचा कट रचला. काल मंगळवारी रात्री दरम्यान अजय बनसोड हा बाहेरुन परतत असताना धबा धरुन बसलेल्या पाचही जणांनी धारदार शस्त्राने त्याचावर हल्ला चढविला. लगेच अजयला रक्ताच्या थारोळ््यात सोडून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची वार्ता परिसरात पसरताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळ गाठून अजयला कै.वसंतराव नाईक वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी करताच मृत घोषित केले. यामुळे पाटीपुरा भागात काहीवेळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी ज्योती अजय बनसोड (२४) हिने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात पाचही आरोपींनी कट रचून खून केल्याचे तक्रारीत नमूद केले. त्यावरून पोलिसांनी बल्ली बाविस्कर, राजा कोल्हे, नितीन धुळे,अनिकेत वासनिक, सचिन डोंगरे यांच्याविरुध्द विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला. घटना घडताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी पोलीस पथकाला सूचना देत आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. पथकाने रात्री दरम्यान शोध मोहिम राबवून दोघांना अटक केली. नेमका खून कोणत्या कारणातून करण्यात आला याचा शोध शहर पोलीस घेत आहे.










