
दोन विधी संघर्षग्रस्त बालकही ताब्यात
यवतमाळ, दि. २६ – स्थानिक उमरसºयातील तीन फोटो चौकात युवकाचा मंगळवारी रात्री १० वाजता खून झाला होता. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त बालकांनाही ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
शुभम बाबाराव वंजारी (१९) रा. जूना उमरसरा असे आरोपीचे नाव आहे. दारव्हा तालुक्यातील गौळपेंड येथील प्रवीण उर्फ पºया शामराव वानखडे हा आई ललीता वानखडे सोबत गेल्या काही वर्षापासून उमरसºयातील गोवर्धन इंगळे यांच्या घरी किरायाच्या खोलीत राहत होता. रोजमजुरीचा व्यवसाय करणाºया प्रवीणचे शुभम व त्याच्या दोन सहकाºयाशी वाद झाला होता. या वादाचा बदला घेण्याच्या दृष्टीकोणातून शुभम व त्याच्या दोन मित्रांनी त्याचा खून केला. प्रवीणची हत्या झाल्यानंतर मारेकºयांना शोधण्यासाठी पोलिसांनी चौफेर तपास सुरू करून सुरूवातीला प्रवीणशी वाद झालेल्या चौघांना ताब्यात घेतले होते. मात्र त्यांच्याकडून कुठलिही माहिती प्राप्त न झाल्याने त्यांना पोलिसांनी सोडून दिले. दरम्यान प्रवीणचा वाद शुभमशी देखील असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी चौकशी करून शुभम व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतल्यानंतर प्रवीणच्या खूनाचे रहस्य उलगडले. पूर्व वैमनस्यातून प्रवीणचा खून केल्याची कबूली शुभम व दोन अल्पवयीन मुलांनी दिली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.









