पेशावरमधील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ठार

peshawar-2
पेशावर – पाकिस्तानातील पेशावर येथील लष्करी शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार सद्दाम पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत ठार झाला.
गुरुवारी पाकिस्तानी सैन्याने जमरूडमधील गुंडी भागात केलेल्या कारवाईत सद्दाम ठार झाला. यावेळी त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आल्याचे खैबर एजन्सीचे पेशावर राजकीय प्रतिनिधी शाहव अली शाह यांनी सांगितले.
तेहरीक ए-तालिबान संघनेच्या तारिक गेदार समूहाचा तो सदस्य होता. पेशावरमधील लष्करी शाळेतील हल्ल्यामागचा तो मुख्य सूत्रधार होता. १६ डिसेंबर रोजी पेशावरमधील शाळेत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १५० ठार झाले होते. यामध्ये अधिकतर लहान मुले समावेश होता.
याआधी गेल्यावर्षी खैबर पख्तुनवाला भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही सद्दाम होता. या हल्ल्यात ११ सुरक्षा रक्षक ठार झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × = sixty three