
नेर, दि. २ – बसस्थानकावरील प्रवाशांचे पॉकीट उडविणाºया घटनांमध्ये वाढ झाली आहे. येथील बसस्थानकावर चोरी करण्याच्या बेतात असलेल्या पाकीटमार टोळीतील पाच महिलांना नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
पद्मा राहुल हांडे (४०), सुनीता सुनील लोंडे (३०), सुनीता कन्ना नाडे (४०), चंदा प्रविण हातागडे (२३), शिला अनील हातागडे (२२) सर्व रा. झोपडपट्टी नागपूर अशी आरोपी महिलांची नावे आहे. नेरसह यवतमाळ येथील बस्थानकावर गर्दीचा फायदा घेऊ न प्रवाशी महिलेचे पर्समधून दागिणे व रोख लंपास केल्याच्या घटना घडल्या आहे. तसेच पुरुषांच्या खिशातील पॉकीट उडविले आहे. दोन दिवसापूर्वी यवतमाळ येथून नेर येथे बसमध्ये प्रवास करणाºया प्रतिभा गणेश जयसिंगपूर (३०) या महिलेचे १० ग्रॅम सोने व पाचशे रुपये रोख उडविले होते. याप्रकरणी यवतमाळ येथील वडगाव रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान आज जयसिंगपूरे ही महिला बसस्थानावर गेल्या होत्या. अशातच बसमध्ये लक्ष ठेऊन असलेल्या काही महिला दिसताच त्याच्यावर लक्ष ठेवले. त्यानंतर त्या चोरी करण्याच्या प्रयत्नात असतानाच पाचही महिला चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यानंतर नेर पोलिसांनी पाचही महिला आरोपींना वडगाव रोड पोलिसांना पाचारण करून त्याच्या ताब्यात दिले. या महिलांकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.









