पोलिसांच्या हातावर तूरी देऊन आरोपी पसार

2014-07-24~Handcuffed_hands_ns
यवतमाळ, दि. २७  – खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाल्याची घटना येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली. बापुराव दंडाजे (३२) रा. चपराळा (आंध्रप्रदेश) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील बापूराव दंडाजे याने पाटणबोरी येथील जावायाचा खून केला होता. तेव्हापासून तो कारागृहातच होता. दरम्यान काल २६ जानेवारीला त्याला पोलिसांनी औषधोपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना, त्याने पोलीस शिपायांची नजर चुकवून हाताची हतकडी खोलून रुग्णालयातून पळ काढला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ two = 9