पोलिसांना ६२ घरे

home
मुंबई – ताडदेव येथील शासकीय मालकीच्‍या भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना पोलिस घरांसाठी या जागेवर आरक्षण असल्‍यामुळे या जागी पोलिसांसाठी ६२ सदनिका उपलब्‍ध करून देण्‍यात येतील, अशी ग्‍वाही गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी विधानसभेत दिली.
मुंबईतील ताडदेव येथील भूखंड क्र. ७२५ या शासकीय भूखंडावरील झोपडपट्टीचा पुर्नविकास करताना या जागी पोलिस वसाहतीचे आरक्षण असल्‍यामुळे त्‍या जागेवर पोलिसांसाठी घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहे काय, असा तारांकित प्रश्‍न आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत विचारला होता. त्‍यावर गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांनी दिलेल्‍या लेखी उत्‍तरात सांगितले की, विकास नियंत्रण नियमावली १९९१ (१०) नुसार आरक्षणाच्‍या २५ टक्‍के क्षेत्र पोलिस हौसिंगसाठी उपलब्‍ध होत असून त्‍यामध्‍ये पोलिसांसाठी स्‍वतंत्र इमारत बांधण्‍यात येणार आहे. या इमारतीमध्‍ये ४१.८८ चौ.मी. ची ६२ घरे उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. हे बांधकाम पोलिस विभागाला मोफत करून देण्‍याचे विकास नियंत्रण नियमावलीमध्‍ये प्रस्‍तावित असून याबाबतचे आराखडे पोलिसांच्‍या गृहनिर्माण विभागाने मंजूर करण्‍याची प्रक्रिया सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 1 = one