
यवतमाळ, दि. १० – पोलीस वाहनाच्या काचा फोडणाºया युवकास पोलिसांनी अटक केली आहे. विकास राजेश मंडके (२५) रा. बांगरनगर असे अटकेतील युवकाचे नाव आहे. शहरात काल शुक्रवारी अतिक्रमण हटाव मोहिम कडेकाट बंदोबस्तात राबविण्यात आली. नेताजी चौक ते बसस्थानक चौकापर्यंत पोलीस बंदोबस्त तैनात होता. अतिक्रमण हटविण्यावरून तणाव निर्माण झाला होता. दरम्यान बसस्थानक चौकातील अतिक्रमण हटविण्यात येत असताना, एका युवकाने पोलीस वाहनाच्या काचा फोडल्या होत्या. पोलिसांनी त्या युवकाचा शोध घेवून त्याला अटक केली आहे. याबाबत निलेश क रंदीकर यांनी वडगावरोड पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी याप्रकरणी युवकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.









