पोलीस व महसूल अधिकाºयासमोरच शेतकºयाने घेतले विष

060620153877
मृतदेहासह नातेवाईकांचा जिल्हाकचेरीसमोर ठिय्या
यवतमाळ, दि. ६ – पोलीस व महसूल अधिकाºयासमक्ष तालुक्यातील लोणी (घाटाणा) येथील शेतकºयाने विषाचा घोट घेतल्याची घटना आज शनिवारी घडली. या घटनेने संतप्त झालेले शेतकरी, नातेवाईकांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला.
बाबूलाल हरलाल राठोड (६०) असे मृतक शेतकºयाचे नाव आहे. मधुकर येरावार यांनी अजय येरावार याच्या नावे असलेली दोन हेक्टर दोन आर जमिन बाबुलाल राठोडला विक्री केली. दरम्यान सिलींगच्या कायद्यानंतर शासनजमा झालेली जमिन भूमिहीन लाभार्थ्यांना देण्याचा शासन निर्णय १९९१ मध्ये झाला. लोणी (वाटाणा) येथील २३ लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे देण्यात आले. मात्र जमिनी ताब्यात न मिळाल्याने या लाभार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सदर शेतकºयाच्या बाजूने निकाल देत जमिनीचे त्याला मालक ठरविले. तर दुसरीकडे लाभार्थ्यांना जमिन ताब्यात देण्याचे आदेश दिले. दरम्यान ५ मे रोजी शुक्रवारी जमिन अधिग्रहण करण्यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी, ठाणेदार वडगाव (जंगल) घटनास्थळी पोहोचले. यावेळी ठाणेदारांनी शेतकºयाला मारहाण करून अपमानस्पद वागणूक दिली. हा मानसिक धक्का बसलेल्या शेतकºयाने अधिकाºयांच्या समक्षच विष घेतले. यावेळी अधिकाºयांनी पोलीस वाहनात शेतकºयाला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र आज शनिवारी ६ जून रोजी पहाटे या शेतकºयाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेले शेतकरी-नातेवाईकांनी मृतदेहासह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine × = 72