पोहरादेवी येथील रामनवमी उत्सवास ना. संजय राठोड यांची भेट

IMG-20150328-WA0077

यवतमाळ,  दि. २८ – बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी (जि. वाशिम) येथे आयोजित रामनवमी उत्सवास आज शनिवारी राज्याचे महसूल राज्यमंत्री, यवतमाळचे पालकमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे संपर्कमंत्री संजय राठोड यांनी भेट देऊन श्री  संत सेवालाल महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
देशभरातील लाखो भाविक या उत्सवात सहभागी झाले होते. ना. संजय राठोड यांनी यावेळी उत्सवात सहभागी भाविकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमानंतर ना. राठोड यांनी संत रामराव
महाराज यांचे आशीर्वाद घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.  या वेळी शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख हरिहर लिंगनवार, दिग्रस तालुका प्रमुख राजकुमार वानखडे, जि.प.सदस्य दिवाकर राठोड, उप तालुका प्रमुख सुभाष जाधव, डी.पी.चव्हाण, नामदेव राठोड, घनश्याम राठोड, मोहन नंदूरकर, कोदेलाल राठोड, राजू देशमुख आदी उपस्थित होते. पोहरादेवी येथे देशभरातून येणार्‍या भाविकांसाठी ना.संजय राठोड यांच्या वतीने टेन्ट उभारण्यात आले होते. या ठिकाणी पाणी, स्वच्छतागृह, रूग्णवाहिका आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. येथेही ना. संजय राठोड यांनी भेट देऊन भाविकांशी चर्चा केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − = 3