प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे निधन

prafuula
मुंबई – आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या प्रसिध्द चित्रकार प्रफुल्ला डहाणूकर यांचे शनिवारी सकाळी मुंबईच्या जसलोक रुग्णालयात निधन झाले. त्या ८० वर्षांच्या होत्या.
गेल्या काही दिवसांपासून डहाणूकर आजारी होत्या. अखेर आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. गोव्यात जन्मलेल्या डहाणूकर यांची संपूर्ण कारर्कीद मुंबईत घडली.मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्टमधुन १९५५ साली त्यांनी चित्रकलेची पदवी घेतली. त्या बॅचच्या त्या सुवर्णपदक विजेत्या पदवीधर होत्या. १९६१ साली फ्रान्स सरकारने त्यांना फाईन आर्टच्या पुढील शिक्षणासाठी शिष्यवुत्ती देऊन गौरवले होते.चित्रकलेतील कौशल्यासाठी प्रफुल्ला डाहणूकर यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळाले होते. जे.जे. आर्ट स्कूलमधून पदवीघेऊन बाहेर पडल्यानंतर काही दिवसातच प्रफुल्ला डहाणूकर यांना बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वार्षिक चित्रप्रदर्शनात रौप्यपदक मिळाले. भारतासह संपूर्ण जगात वेगवेगळया चित्रप्रदर्शनांमध्ये त्यांच्या चित्रांची दखल घेतली गेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


7 × one =