प्रियकराने प्रेयसीला केले मित्रांच्या स्वाधीन , रम पाजून सामुहीक अत्याचार, चौघांना अटक

only-you-can-complete-my-heart
यवतमाळ – अमरवती तालुक्यातील  मुलीला प्रेमाच्या जाळ््यात अडकवून तीला  मित्रांच्या स्वाधीन केल्याची घटना आज उजेडात आली. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी चार आरोपींना जेरबंद केले असून पाच आरोपी फरार आहे. या घटनेने यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करीत आहे.
अमरावती जिल्ह्यातील बोरगाव (धर्माळे) येथील मुलगी अरामवती येथे दहाव्या वर्गात शिक्षण घेत होती.  रहाटगाव येथील पंकज गवई (२५) हा अमरावती येथे महाविद्यालयात असल्याने एकाच बसमध्ये ते दोघेही ये-जा करीत होते. अशातच त्याच्यात मैत्री व नंतर प्रेमात रुपांतर झाले. त्यानंतर या युवकाने मुलीसोबत शारीरीक सबंध प्रस्तापित करून सतत अत्याचार करीत होते. २१ नोव्हेंबरला  पंकजने सदर मुलीला  बाहेरगावी फिरायला जाण्याच्या बहाण्याने अमरावतीला बोलाविले. पंकजने तिला देशमुख लॉन, लाठीनगर व नागपुर बायपासवरील नांदगावपेठ येथे पाठविले. त्याच्या तीन मित्रांनी तिला बियर पाजुन तिनदा सामुहीक अत्याचार केला. त्यानंतर पंकज २४ नोव्हेंबरला पिडीतेला यवतमाळ येथे घेऊन आला. पंकजने पिडीतेला मंगेश कुभांर व नितीन शेंडे यांच्या स्वाधीन केले. हे दोघेही मुळचे अमरावती येथील असून, कामासाठी ते यवतमाळात वास्तव्यास आहे. या दोघांनी पिडीतेवर बंदरबाबा बायपास जवळच्या जंगलात अत्याचार केला. त्यानंतर पंकज रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास पिडीतेला बसस्थानकावर घेऊन आला. अमरावतीला जाण्यासाठी बस नसल्यामुळे पंकजने पिडीतेला एका बसमध्ये झोपण्यास सांगून तो बसस्थानकाच्या परीसरात उभा राहिला. दरम्यान बसस्थानकातील कर्मचाºयाने बसमध्ये झोपलेल्या मुलीची चौकशी केली तेव्हा तिच्या तोंडून दारूचा वास आला. काही तरी गडबड आहे म्हणून कर्मचाºयाने गस्तीवर असलेल्या पोलिसांनी बोलाविले. वडगावरोड पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता तिने आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. पोलिसांनी  पंकज व त्या मुलीला ताब्यात घेतले. आज मुलीचे बयाण नोंदविल्यानंतर व पंकजची कसून चौकशी केल्यानंतर वैभव कळसकर, किशोर शेंदुरकर, विशाल देशमुख, धिरज गायकवाड, अकुंश वानखडे, पंकज, मंगेश कुभांर नितीन शेंडे (वयोगट २० ते २५) रा. सर्व जण अमरावती अशी नावे समोर आली. पोलिसांनी वैभव कळसकर, किशोर शेंदुरकर, विशाल देशमुख या चौघांना अटक केली. पाचजण फरार असून, दोन आरोपींची नावे उघड व्हायची आहे.पिडीतेला न्याय देण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


two − = 0