प्रेमप्रकरणातून पोलीस शिपायाची आत्महत्या

‘व्हॅलेंटाईन डे’ला  प्रेयसीच्या घरी घेतले विष
यवतमाळ  –  सर्वत्र ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा होत असताना येथील शहर पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपायाने  प्रेयसीच्या घरी जाऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.  राळेगाव तालुक्यातील झिल्ला येथे आज दुपारी दोन वाजता ही घटना घडली.  राहुल  वामन खरतडे (४५) रा. सुवर्णनगर वाघापूर असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव असून तो शहर ठाण्यात  कार्यरत होता. तीन दिवस तो रजेवर गेला होता. आज ‘व्हॅलेंटाईन डे’ असल्याने आपल्या दुचाकीने राळेगाव तालुक्यातील झील्ला येथे  गेला. तेथील एका युवतीच्या घरी जाऊन त्याने विषारी औषधी प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेची माहिती मिळताच वडकीचे ठाणेदार एम.एस. राजपूत यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. यावेळी त्याच्या शिखात किटकनाशक खरेदी केल्याचे बिल आढळले असून ते राळेगाव येथील कृषी केंद्रातून खरेदी केले. खरतडे हा विवाहीत असून  त्याचे यवतमाळ येथील एका महाविद्यालयात बी.ए. भाग दोनला असलेल्या युवतीवर प्रेम करीत होता.आज ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त प्रेयसीला भेटण्याठी तिच्या गावी गेला. अशातच त्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − five =