प्रेमीयुगुलास अटक

108
यवतमाळ, दि. ६ – दारव्हा तालुक्यातील महागाव (कसबा) शिवारातील शेतात लपून असलेल्या प्रेमीयुगुलास लाडखेड पोलिसांनी अटक केली. या कारवाईमुळे नागरिकांत विविध चर्चेला उधाण आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील संदीप देवराव पिंगाने (२२) या युवकाने एका अल्पवयीन युवतीला प्रेमजाळ््यात ओढले. ‘साथ जियेंगे साथ मरेंगे’ अशी शपथ घेतलेल्या प्रेमीयुगुलाने घरून पळ काढला. या घटनेची माहिती युवतीच्या घरी माहित पडताच त्यांना मानोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. महागाव (कसबा) शिवारात असलेल्या शेतात प्रेमीयुगुल लपून असल्याची माहिती लाडखेड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी रात्रीच परिसर पिंजून काढायला सुरूवात केली. रात्री १ वाजता दरम्यान शंकर परांडे यांच्या शेतात प्रेमीयुगुल लपून असल्याचे आढळून आले. लगेच दोघांना अटक करून पोलिसांनी लाडखेड पोलीस ठाणे गाठले. वाशिम जिल्ह्यातून पळून आलेल्या प्रेमीयुगुलास अटक करण्यात आल्याच्या चर्चेने परिसरात खळबळ उडाली. ही कारवाई बिट जमादार राजेश्वर राठोड, सलीम पप्पुवाले, शेख अनिस,मनीषा दुथळे,बंडू ताजणे आदींनी केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − = 2