प्रेयसीचा मृतदेह नदीत फेकणारा नराधम प्रियकर जेरबंद

friend-murder_SECVPF
भंडारा – बेकायदेशीर गर्भपातादरम्यान मृत्यू झालेल्या प्रेयसीचा मृतदेह वैनगंगा नदीत फेकणाऱ्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. तसेच त्याला सहकार्य करणाऱ्या ३ जणांनाही अटक करण्यात पोलिसांना यश आले असून भोंदू डॉक्टर मात्र फरार आहे.
सुमित लंजे (वय २२) असे आरोपी प्रियकराचे नाव असून त्याला नागपूरमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी, ३१ मार्चपासून सदर मुलगी बेपत्ता झाली होती. पालांदूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वैनगंगा नदीत पोत्यात दगडाला बांधलेला तिचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या नागपूर येथून मुसक्या आवळल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 8 = eight