
यवतमाळ – महात्मा ज्योतीबा फुले – डॉ.बाबासाहेब आंबेडकर समता पर्व प्रतिष्ठानच्या वतीने २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत स्मृती पर्व – २०१४ चे आयोजन करण्यात आले आहे. आझाद मैदान येथील क्रांतीज्योती सावित्रीआई फुले समता परिसर येथे होणाºया कार्यक्रमात विविध संस्था आणि संगटनांचा सहभाग राहणार आहे. नऊ दिवस चालणाºया स्मृतीपर्वात विविध समाज घटकातील विचारवंत विविध विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्टÑ उभारणीसाठी समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधुत्वाचा पाया भक्कमपणे रचला. महात्मा ज्योतीबा फुले यांनी समाज क्रांती करून बहुजन समाजाच्या वैचारिक जडणघडणीत सर्वोच्च योगदान केले. या दोन्ही महामानवांचा स्मृतीदिन साजरा करीत असताना बहुजनांचे प्रबोधन व्हावे या हेतुने तमाम बहुजनांनी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. जमातवाद विकासाच्या मार्गातील धोंड, भारतीय समाजात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक परिवर्तनामध्ये मराठा सेवा संघाचे योगदान, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि इस्लाम, शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी म.फुलेंची विचारधारा हाच एकमेव पर्याय, ओबीसी समाज व फुले-शाहु-आंबेडकर विचारधारा, तसेच सम्राट अशोकची शासन प्रणाली आणि भारतीय संविधान आदि विषय स्मृतीपर्वाच चर्चिले जाणार आहेत.
स्मृतीपर्वात आदिवासी मुक्तीदल व भटक्या विमुक्त जमाती, स्मृतीपर्व महिला समीती, मराठा सेवासंघ, ख्रिस्त भक्तमंडळी, जमात ए इस्लामी (हिंद), ओबीसी सेवासंघ, तेली समाज महासंघ, गुरु रविदास विचारमंच, लोकशाहीर अन्नाभाऊ साठे स्मारक समीती तथा आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यवतमाल यांचा सहभार राहणार आहे. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ज्ञानेश्वर गोबरे, विलास काळे, मंसूर एजाज जोश, देवानंद पवार, मनोज रणखाम, आनंद गायकवाड, डॉ.दिलीप महाले, प्रा.सुनंदा वालदे, कवडू नगराळे, राजेश मुके, संजय तरवरे, विनोद फुलमाळी, पी.पी.पवार, डॉ.सुभाष जमदाळे, कुंदा तोडकर, माधव सरकुंडे, सुनिता काळे, माया गोबरे, रियज सिद्दीकी, संजय बोरकर आदिंनी केले.









