फुले आणि कांशीराम यांना भारतरत्न देण्याची मागणी

pic
लखनऊ – जर केंद्र सरकार मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊ शकते तर महात्मा जोतिबा फुले आणि कांशीराम यांनाही मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत केली.
भाजप हा जातीयवादी पक्ष आहे. केंद्रातल्या भाजपच्या सरकारने एकाच जातीच्या दोन व्यक्तींना भारतरत्न हा देशातील सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर केला आहे. मात्र दलित किंवा अन्य मागासवर्गीयांचा या पुरस्कारासाठी विचार केलेला नाही, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर दलितांच्या उद्धारासाठी कांशीराम भरपूर काम केले. त्यामुळे हे योगदान लक्षात घेऊन कांशीराम यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी मायावती यांनी केली. दलित, मागासवर्गीय आणि महिलांच्या शिक्षण तसेच समानतेसाठी अखेरच्या श्वासापर्यंत अविरत काम करणा-या महात्मा जोतिबा फुले यांचाही मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरव करण्याची मागणी मायावती यांनी केली.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदनमोहन मालवीय यांना २५ डिसेंबर २०१४ रोजी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रजासत्ताक दिनी हा भारतरत्न प्रदान केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर बसपच्या अध्यक्षा मायावती यांनी केंद्रातल्या मोदी सरकारच्या भारतरत्न संदर्भातल्या निर्णयावर टीका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− two = 2