फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर

images
यवतमाळ –  एका तरूनाने फेसबुकवर आक्षेपार्ह मजकुर अपलोड केल्याने महागाव तालुक्यातील काळी दौ येथे तणावाचे वातावरण निर्माण झााला. पुसद ग्रामीण पोलीससंनी आरोपीविस अटक करून न्यायालयात हजर केले.
सचीन ग्यानबा भोने (२१) रा. काळी दौ. असे आरोपीचे नावे आहे. या तरूणाने फेसबुकवर एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावन्याच्या हेतुने सदर मजकुर अपलोड केला होता. हा प्रकार उजेडात येताच   गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांनी या आरोपीला अटक करून कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली. या बाबतची भनक लागताच आरोपीने गावातून काढता पाय घेतला होता. याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल करून जेरबंद केले. गावामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


6 × eight =