फौजदारी, कर खटल्यांसाठी स्वतंत्र न्यायालये

supreme-court
नवी दिल्ली – फौजदारी आणि कर निवाडय़ासंदर्भातील खटले तातडीने निकाली काढण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सोमवारपासून दोन स्वतंत्र न्यायालये सुरू केली आहेत. प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एम. के. हंजुरा म्हणाले की, जुने फौजदारी खटले आणि करविषयक याचिका निकाली काढण्यासाठी सरन्यायाधीशांनी ही न्यायालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात ११,१३७ फौजदारी आणि १०८४३ करविषयक खटले प्रलंबित आहेत. या न्यायालयासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने आवश्यक त्या पायाभूत सुविधा पुरवल्या आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात मोफत ‘वाय-फाय’ सुविधा पुरवल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 − = zero