बबन घोलप यांना तीन वर्षांची शिक्षा

download
मुंबई- बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेचे शिर्डीतील लोकसभा उमेदवार बबनराव घोलप यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पदाचा गैरवापर करून अमाप संपत्ती जमवल्याच्या आरोपावरून घोलप आणि त्यांची पत्नी शशिकला यांना तीन वर्षांचा सश्रम कारावास तसेच एक लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
शिवसेना-भाजप युतीच्या मंत्रिमंडळामध्ये बबन घोलप हे समाजकल्याणमंत्री होते. १९९९ मध्ये युतीच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळाल्यानंतर अवघ्या साडेतीन वर्षांत त्यांच्या व पत्नीच्या नावे एकूण ५० लाख रुपये जमा असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (एसीबी) तपासात आढळून आले होते. मात्र त्यांचा निवडणूक खर्च ८० लाख रुपये एवढा झाला होता. या प्रकरणी लाच-लुचपत खात्याने घोलप यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती, हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याप्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी त्यांना तीन वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× four = 12