बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

IMG-20141203-WA0076
यवतमाळ – बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवारी जोडमोहा नजिक घडली. गणेश मडावी (२८) रा. वटबोरी असे मृतकाचे नाव आहे. गणेश आपल्या एम. एच. २९ पी ५९८४ क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळ जात असताना, यवतमाळवरून पांढरकवडाकडे जाणाºया एम. एच. ४० ८९६७ क्रमांकाच्या बसने त्याला जोडमोहानजिक समोरासमोर धडक दिली. या धडकेत गणेशच्या डोक्याला व शरीराला गंभिर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी बसचालक प्रमोद मनवर याचेविरुध्द गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 3 = twelve