
सातारा – सातारा-मुंबई मार्गावर पारगाव खंडाळा येथे खाजगी बसला मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला आहे. बस उलटल्याने तब्बल आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ३५ प्रवासी जखमी झाले आहेत. उपचारांसाठी जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाल्याचे समजतो. बस उलटल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ खोळबंली होती. तसेच येथे थांबलेल्या काही गाड्यांना एक कंटेनरने धडक दिल्याने दुसरा देखील अपघात झाला. या अपघातात देखील काही जण जखमी झाले आहेत.या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याचे आढळून आले आहे. मागील महिन्यात देखील याच मार्गावर काही भीषण अपघात झाले होते.









