बस दरीत कोसळून २० ठार

index
शिमला – हिमाचल रोड ट्रान्स्पोर्टची बस दरीत कोसळून मंगळवारी २० जण ठार, तर सात जण जखमी झाले. येथून ६५ किलोमीटरवर असलेल्या कतारघाटात मंगळवारी दुपारी हा अपघात झाला. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
शिमल्याहून निघालेली बस सवेराखूदला निघाली होती. बसमध्ये ३० प्रवासी होते. बसंतपूर किंजल महामार्गावरील घाटात बस दरीत कोसळली. आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसच्या चक्काचूर झालेल्या सांगाड्यात आणखी काही मृतदेह अडकले असल्याचे शिमल्याचे पोलिस अधीक्षक डी. डब्ल्यू. नेगी यांनी सांगितले. अपघात होताच ड्रायव्हरने उडी मारून स्वतःचे प्राण वाचविले. जखमींना येथील इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× 1 = one