बाबा रामपालविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

index

बरवाला (हिसार) –  हरियाणाच्या हिसार जिल्हयातील बरवाला नगर येथील वादग्रस्त बाबा रामपालविरोधात पोलिसांनी बुधवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.

पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रामपाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत शुक्रवारपर्यंत त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते़ मंगळवारी पोलीस रामपाल यांना अटक करण्यासाठी आश्रमात पोहोचले़ मात्र रामपाल समर्थकांनी त्यांना रोखले़ यामुळे तणाव वाढला. पोलीस आणि समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६ महिला व एका मुलाचा समावेश आहे. शेकडो जण जखमी झाले असून २७० संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानूसार, बाबा रामपाल यांच्या आश्रमात ५ ते ७ हजार समर्थक अजूनही आहेत. आश्रमामधून हजारो जणांना पोलिसांना काढण्यात यश आले असून यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार महिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सतलोक आश्रमामधून करण्यात आला आहे तर हा दावा पूर्णत: बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × = 40