बाळासाहेब ठाकरे जयंती शिवसेना राबविणार विविध उपक्रम

10f4img_186732_balasahebthakary_240x180
यवतमाळ ,दि. १५  – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्त १७ ते २५ जानेवारी पर्यंत शिवसेना जिल्हाभर विविध उपक्रम राबविणार आहे. या कार्यक्रमाला शिवसेना नेते तथा परिवहनमंत्री दिवाकर रावते, पालकमंत्री तथा महसुलमंत्री संजय राठोड,  खा. भावना गवळी उपस्थित होते.
सामाजिक उपक्रमामध्ये रुग्णांमध्ये रुग्णांकरिता शिबिरे, रक्तदान शिबिरे, थोर पुरूष पुतळे स्वच्छता, आदी कार्यक्रम जिल्हाभर होणार आहे. १७ ते २२ जानेवारी पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज व मराठ्यांनी युध्दात वापरलेला विविध  शस्त्र, अस्त्रांची प्रदर्शनी स्थानिक गुरूदेव मंगल कार्यलय दारव्हा रोड येथे आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये चिलखते, विविध प्रकारच्या तलवारी, ढाली, दांडपट्टे, वाघनखे, भाले, शिरस्त्राणे आदींचे माहितीपूर्ण प्रदर्शन होणार आहे.
२३ जानेवारील अस्सल मराठमोळ््या संस्कृतीचे प्रदर्शन घडविणारा ‘मी मराठी’ हा कार्यक्रम सायंकाळी ६ वा. अभ्यंकर कन्या शाळाच्या प्रांगणावर होणार आहे. विठ्ठल उमप थिएटर्स मुंबई प्रस्तूत हा कार्यक्रम सुमारे २५० कलाकारांच्या संचासह लोकहीत बहु. संस्था यांच्या सहकार्याने होत असून, विविध सिने व टिव्ही कलावंतांचा या कार्यक्रमात समावेश राहणार आहे. याकरिता प्रवेशीका शिवसेनेच्या निवड शाखांवर उपलब्ध राहणार आहे. हाय कार्यक्रम २२ जानेवारी सायंकाळी ६ वा. शिवाजी स्टेडीयम, दारव्हा येथे २४ जानेवारी ला ६ वा. स्व. चंद्रशेखर पाटील जिनचे मैदान,  दिग्रस व २५ जानेवारीला काळे स्टेडीयम मैदान अजंती रोड, नेर येथे आयोजित करण्यात येणार आहे.
तसेच २३ जानेवारीवा ‘हिदुत्व रॅली’ हा पे्रक्षणीय तसेच शिवसेना व हिंदूत्वाचे प्रदर्शन करणारा सोळा होणार आहे. २३ जानेवारीला दुपारी १२ वा. पोस्टल मैदान येथे १० हजार शिवसैनिक शिस्तबध्द रितीने ड्रेसकोड मध्ये जमणार आहेत. पांढरा शर्ट, पांढरा पँट व भगवा शेला ह्या वेशात जिल्हा भरातील शाखांमधील शिवसैनिक हिंदुत्व रॅलीचा बिगुल यवतमाळ शहरात फुंकणार आहे. या रॅलीमध्ये भगव्य साडीमध्ये महिला रणरागिणीचाही सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख तथा माजी आ. श्रीकांत मुनगिनवार, निवासी उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड, शहरप्रमुख पराग पिंगळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven + 9 =