बिबट्याचा गायीवर हल्ला

images
झरी (यवतमाळ ), दि. २२ – तालुक्यातील मार्की(बु.) येथील उत्तम शिवराम पडघन यांच्या शेतात चौथ्यांदा बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली. आज सकाळी सदर शेतकरी शेतात गेला असता वासराला वाचविण्यासाठी गाय बिबट्यासोबत संघर्ष करीत असल्याचे दिसून आले. हे दृश्य बघून घाबरलेला शेतकरी एका झाडावर लपून बसला. बराच वेळ गाय व बिबट्यात संघर्ष चालला. त्यानंतर बिबट्या जंगलाच्या दिशेने निघून गेला. ही बाब उत्तम पडघन याने गावात येवून ग्रामस्थांना सांगितली. नागरिकांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. पायघन यांच्या शेतात बिबट्याने चौथ्यांदा हल्ला चढविला आहे. वनविभागाने परिसरात केवळ एक पिंजरा लावला. मात्र बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकºयांकडून रोष व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 2 = ten