बिबट्याचा मृतदेह आढळला

index
यवतमाळ  – बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला शिवारात  बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उजेडात आला असून अळ््यांनी वाघाचे शरीर पोखरल्याचे समोर आले आहे. या बिबट्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसून विष प्रयोग केल्याचे बोलल्या जात आहे.
यवतमाळ वनविभागातील बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला जंगलात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे कुजलेला बिबट्याचा मृतदेह दिसला. या बाबतची माहिती मिळताच उपवनसंरक्षक प्रेमचंद लाकरा, सहा. उपवनसंरक्षक वाभळे, उपवनसंरक्षक दहिवले, अविनाश घनमोडे, गवई, यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर जगताप, मानद वनजीव रक्षक शाम जोशी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मृतक बिबट्याचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असून तो म्हातारा झाला होता. त्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसुन कातडी व नख साबुत होते. त्यामुळे विषप्रयोग करुन बिबट्याला मारल्याची चर्चा वन्यप्रेमीमध्ये सुरु आहे. नेर येथील पशुवैद्यकीय अधिकरी डॉ. खोडवे यांना पाचारण करुन घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूचे गुढ  शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− three = 4