बिबट्याची कातडी जप्त , आंध्रप्रदेशात शिकार

02ytl23
पांढरकवडा (यवतमाळ )- आंध्रप्रदेशातून विक्री करण्यासाठी येत असलेली बिबट्याची कातडी अत्यंत शिताफीने वनविभागाने जप्त करून तिघांना अटक केली आहे. ही कारवाई आज पाटणबोरीनजीक करण्यात आली. रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम (रा. मारेगाव बंडल),असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील काही शिकारी १० लाख रुपयात बिबट्याची कातडी महाराष्टÑात विकणार असल्याची गुप्त माहिती वनविभागाच्या सूत्रांना मिळाली. त्यावरून वनविभागाच्या कर्मचाºयांनी व्यापारी बनून १० लाख रुपयात कातडीचा सौदा केला. दुचाकीने तिघे महाराष्टÑ येत असताना पिंपळखुटी चेक पोस्ट वर रामू कुमरे, सुखदेव खडके, प्रमोद मेश्राम यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्याजवळ बिबट्याची कातडी असल्याचे आढळून आले. वनविभागाच्या पथकाने यावेळी बिबट्याची कातडी, दुचाकी क्रमांक एम.एच. २९ आर/ ९९२८ वनविभागाने जप्त केली. आरोपी विरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत ९, २९, ४४, ४८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १ महिन्यापूर्वी आंध्रप्रदेशात शिकार केल्याचे प्राथमिक चौकशीत आरोपींनी सांगितले. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी वाय.डी. नागुलवार, वनपाल दिपेश लोखंडे, वनकर्मचारी कुन्नेनवार, भोयर, मिलमिले, अश्विन राठोड यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight − = 5