बिबट्या जेरबंद

tiger1

कोल्हापूर – शहरातील रुईकर कॉलनी परिसरात आलेल्या बिबट्यामुळे सकाळीच नागरिकांची तारांबळ उडाली. खासदार धनंजय महाडिक यांच्या बंगल्यासमोरील रिकाम्या प्लॉटमध्ये वाढलेल्या झाडीत हा बिबट्या लपून बसला होता. नागरिकांनी बिबट्याला पहाण्यासाठी गर्दी केल्यामुळे आणि गोंधळ सुरू झाल्याने रिकाम्या जागेत इकडून तिकडे तो सतत पळत होता. त्याला पकडण्यासाठी वनविभाग, पोलिस आणि प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. सुमारे ४ तास हे थरार नाट्य सुरू होते. त्यानंतर स्थानिक नागरिक, वनविभाग आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − = 3