
यवतमाळ – सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या पितापुत्राला अरूणावती नदी पात्रात एका पेटीत हॅँन्ड ग्रेनेड व काडतूस आढळून आल्याची खळबळजनक घटना काल दुपारी १.३० वाजता दरम्यान उघडकीस आली होती. आज बॉम्ब शोधक पथकाकडून अरुणावती नदीपात्राची पाहणी करण्यात आली. हे घातक साहित्य ४० वर्षापूर्वीचे असल्याचा प्राथमिक अंदाज पोलीस सूत्रांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात खळबळ उडवून देणाºया या घटनेत स्फोटक साठा कुणाचा असावा असावा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या प्रकरणी अफसर खान इसाक खान रा. आर्णी याने पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी कलम २८६. भा,द,वी, नुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हे स्फोटक पदार्थ नदीच्या पात्रात कुणी आणि केव्हा फेकला असावा, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. ३ हॅँन्ड ग्रनेड व २३ जिवंत काडतूस यावर १९६२ सालीच्या खुना आढळून आल्याची माहिती पोलीस सूत्राने दिली. तपासाणी करिता आर्णी पोलिसांनी न्यायालयाला परवानगी मागितली असून, त्यानंतर स्फोटक साहित्य कुठून आले आणि कुणी टाकले याची उकल होणार आहे. आज सकाळी १०.३० वाजता यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, ठाणेदार हनुमंत गायकवाड, तपासधिकारी पीएसआय राजकिरण मडावी, कैलास निबर्ते व बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी जावून पंचनामा केला. आर्णी तालुका नक्षलग्रस्त असल्याने पोलीस या प्रकरणाचा तपास बारकाईने करीत आहे.









