यवतमाळ – लग्न पाच दिवसावर येउन ठेपले असताना बोहल्यावर चढण्यापुर्वीच नवरदेव तीन दिवसापुर्वी रहस्यमय बेपत्ता झाल्याची घटना शहरालगत असलेल्या पिंपळगाव ग्रा. पं. क्षेत्रात घडली असून गणेश नारायण दिवटे (३०) असे बेपत्ता झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. नातेवाईकांकडून शोधाशोध सुरू असून या प्रकरणी वडगावरोड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.
शहरात मसाल्याची एजन्सी चालविणाºया गणेशचे नेर तालुक्यातील पाथ्रड गोळे येथिल एका मुलीशी लग्न जुळले होते. येत्या ५ मे ला त्याचा विवाह होणार होता. घरी लग्नाची धामधुम सुरू असताना २९ तारखेला त्याला अचाानक दुपारी फोन आला. फोनवर बोलल्या नंतर गणेश घराबाहेर पडला. त्यानंतर मात्र तो घरी परतलाच नाही. त्यामूळे त्याच्या कुटुंबीयानी त्याला शोधण्यासाठी धावपळ सुरू केली. परंतू गणेशचा पत्ताच लागत नसल्याने काल शुक्रवारी वडगावरोड पोलिसात याप्रकरणाची तक्रार नोंदविण्यात आली असून पोलिसानी त्याचा शोध सुरू केला आहे. गणेश बेपत्ता झाला त्या दिवशी त्याची मोठी बहिण लग्नासाठी यवतमाळ बसस्थानकावर उतरल्यानंतर बसस्थानकावर घेण्यासाठी तीने गणेशला फोन लावला होता. गणेशने मी कामात असल्याचे सांगून अॅटोने जाण्याचे सांगितले होते. त्यानंतर मात्र गणेशचा मोबाईल स्विचआॅफच होता. त्याची हिरोहोंडा दुचाकी काल बसस्थानकात पोलिसाना मिळाली असून आर्णीकडे तो आज दिसल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे नातेवाईक आर्णीला त्याचा शोध घण्यासाठी गेले होते. वृत्त लिहेपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.









