भरधाव ऑटोची डिझायर कारला धडक

DSC02974
वाशीम : आज (दि.२५) रोजी दुपारी २ ते ३ च्या सुमारास डॉ. कानडे हॉस्पीटलसमोर भरधाव वेगाने येणार्‍या ऍटोने समोरुन येणार्‍या डिझायर कारला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये ऍटोमधील दोन युवक किरकोळ जखमी झाले. तर धडकेमुळे डिझायर कारचे इंजन चेपुन कारचे नुकसान झाले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतुक सुमारे एक दोन तास विस्कळीत झाली होती. पोलीसांनी तेथे बंदोबस्त लावून वाहतुक सुरळीत केली. अपघातग्रस्त कार ही हिंगोलीची तर ऍटो हा वाशीम तालुक्यातील कळंबा महाली येथील असल्याचे समजते. जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

हिंगोली अकोला राज्य महामार्गावर हिंगोली नाका ते अकोला नाका दरम्यान जड वाहनंाची वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून ही वाहतुक बायपासमार्गे शहराच्या बाहेरुन वळविण्यसाठी बायपास सुरु करण्याची मागणी सातत्याने होत आहे. जेणेकरुन शहराच्या अंतर्गत भागातून होणार्‍या वाहतुकीचा ताण कमी होईल. या महामार्गावर सातत्याने होणार्‍या लहानमोठ्या अपघातामध्ये महामार्गावर दुतर्ङ्गा वाढलेले अतिक्रमणही कारणीभूत आहे. तसेच हिंगोली नाका चौक, पुसद नाका चौक, बस स्टॅन्ड चौक, अकोला नाका चौक आदी भागात वाहतुक पोलीसांची ड्युटी असली तरी पोलीस वाहतुकीकडे लक्ष न देता केवळ वाहनधारकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यातच जास्त लक्ष देतात. पुसद नाका चौक तसेच पोस्ट ऑङ्गीस चौकामध्ये पोलीसांच्या डोळ्यादेखत मोठ्या प्रमाणात अवैध वाहतुक धुमधडाक्यात सुरु आहे. या अवैध वाहनामध्ये नियमापेक्षा दुप्पट तिप्पट संख्येने प्रवासी भरुन भरधाव वेगाने वाहतुक केली जात असल्यामुळे हे ही अपघातांचे एक प्रमुख कारण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


nine − 8 =