भरधाव बस झाडावर आदळली, ११ प्रवासी जखमी

IMG-20150203-WA0058
दिग्रस , दि. ३  – भरधाव बस बाभळीच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता दरम्यान हरसूल फाट्यानजीक घडली.
लातूर डेपोची बस एम.एच २०/ बिएल २९५३ नागपूरकडून परळीकडे जात असतांना दिग्रस तालुक्यातील हरसुल फाट्याजवळ अपघात झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नागमोडी वळण असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. बसमधील ११ प्रवाशी जखमी झाले त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये सोमसिंग उमला पवार रा. सिंगद (४५), युनुस महमद गोंडील रा.दिग्रस (५५), विजय अंबादास इंगळे रा.पुसद, अ.रहेमान शे.इब्राहीम दिग्रस चाँदनगर (५५), सूरज सोपानराव दराडे रा. परळी वैजनाथ (३२), गणेश अविनाश तंवर रा.हिवळणी (३०), अमर देवराव वरारकर रा.पालम (३८), कोमल प्रताप चव्हाण रा.कळसा (४५), सुधाकर श्रीराम कांबळे रा.धुंदी उमरखेड (५४), राजेश क्रिष्णा राठोड रा.धुंदी (४३), उदल स्वरूपचंद पडवाळ रा. सेवानगर (४५) यांचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरीता दिग्रस ग्रामिण रूग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले होते प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांची जिल्हा रूग्णालयात रवानगी केली. या प्रकरणी दिग्रस पोलीसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


six + = 8