भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी शिबिर

Untitled-1
नागपूर – भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. सदर शाळेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती केली असून २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून ५ वा वर्ग सुरू करण्यात येत आहे. केजी   ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे.
शाळेची इमारत ही मातृसेवा संघाजवळ, कोठी रोड महाल या शहराच्या मध्यभागी असून पंडित बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित आहे. ही शाळा संपूर्ण इंग्रजी माध्यमाची आहे. या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे सर्व अ‍ॅक्टिव्हीटी घेतल्या जातात. तसेच सर्व सण, उत्सव यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ते शाळेत साजरे करण्यात येतात. शाळेची फी अत्यंत माफक आहे. यासोबतच दरवर्षी विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केल्या जाते. यावर्षी महात्मे नेत्रपेढीतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलाप्रदर्शन, छंद शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला, संस्कृत व इंग्रजीचे संभाषण वर्ग, अबॅस्कस आदी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना दररोज नास्ताही देण्यात येतो. अधिक माहितीसाठी ९५९५३७४०६८, ९९२१७९६७३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापिका देऊळवाडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three × 8 =