
यवतमाळ – किरकोळ कारणावरून इसमाचा वस्तºयाने खून केल्याची घटना काल रात्री भारी येथे घडली. गजानन गेडाम असे मृताचे नाव असून, रमेश बावणे (५५) व राकेश बावणे (२२) या बापलेकास पोलिसांनी अटक केली आहे.
तालुक्यातील भारी येथील या बापलेकांनी गजानन गेडाम याच्याशी म्हशीचे केस काढण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादात रमेश व राकेश यांनी गजानन गेडाम याच्या गळ््यावर वस्तºयाचे घाव घातले. रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या गजाननला पाहुन दोघानीही घटनास्थळावरून पळ काढला. मुलाला रक्ताच्या थारोळ््यात पाहून त्याची आई जोष्णा गेडाम घरातून धावत आली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याच्या तयारीत असताना, गजाननचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी दोघाविरुध्द गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.









