भूकंपाने उत्तर भारत हादरला , ४ ठार, इमारती कोसळल्या

kes-Lamjung-Nepal_SECVPF
नवी दिल्ली- देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारत आज (शनिवारी) दुपारी पावणे बाराच्या सुमारास भूकंपाच्या तीव्र धक्क्याने हादरला. साधारण दीड ते दोन मिनिटे भूकंपाची धक्के जाणवले. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील नागपुरसह मुंबईत अनेक भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 7.4 इतकी या भूकंपाची तीव्रता असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे
नेपाळची राजधानी काठमांडूपासून 83 किलोमीटर अंतरावर भूकंपाचा केंद्र आहे. काठमांडूमध्ये काही भागात इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. नेपाळच्या इतिहासात हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे बोलले जात आहे. काठमांडूमध्ये फोन सेवा ठप्प झाली आहे. त्याचप्रमाणे पाकिस्तान, बांगलादेशातीही भूकंपाचे धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे.
दिल्ली, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, सिक्कीम, पंजाब, गुजरातमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के बसल्याची माहिती मिळाली आहे. साधारण दीड ते दोन मिन‍िटे एकापाठोपाठ भूकंपाचे अनेक धक्के जाणवले.नेपाळमध्ये आज दुपारी पावणे बाराच्या सुमारास हाहाकार माजविला आहे. ७.९ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात ४ जण ठार झाल्याचे वृत्त आहे. अनेक मोठ्या इमारती कोसळल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 9