मतदारांना प्रलोभने दिल्यास तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक

4682758121174741776_Org

यवतमाळ  – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार अथवा सामान्य नागरीकांना आपल्या तक्रारी तथा सुचना नोंदविता याव्या म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यानंतर मतदारांना पैसे, भेटवस्तू अशा प्रकारची आमिषे दाखविली जातील. असा प्रकार उघडकीस आल्यास किंवा प्रत्यक्ष पाहण्यात आल्यास नागरीकांना ०७२३२-२३९७००, २५५०७७, २४०७२० या टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच निवडणूकीच्या कालावधीत अवैध दारू विक्री, संशयीत वस्तू किंवा शस्त्रास्त्रे इत्यादीबाबी आढळल्यासही वरील क्रमांकावर कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 + eight =