मध्यप्रदेशात भाजपने वाटले पैसे, निवडणूक आयोगाकडे तक्रार

images
भोपाळ – मध्यप्रदेशात एका स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष मतदारांना पैशांचे वाटप करत असल्याची तक्रार कॉंग्रेस पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केलीय. मध्यप्रदेशातील भिंड लोकसभा मतदारसंघात भाजपने मतदारांना पैसे वाटले असल्याचे सांगत मध्यप्रदेशचे विरोधी पक्षनेते सत्यमेव कटारे यांनी यासंबंधी आयोगाकडे पुरावे सादर केले. ‘गटजोड सुख समृद्धी वेल्फेअर सोसायटी’ या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून मतदारांना पैसे वाटण्यात आल्याचा आरोप कटारे यांनी केला. रेवा येथील मतदारांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा केल्याचा आरोप त्यांनी केला. हे आचारसंहितेचे उल्लंघन असून, हा गंभीर गुन्हा असल्याचे कटारे म्हणाले. मागील विधानसभा निवडणुकांमध्येही भाजपने असेच पैसे वाटले होते’ असे कटारे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven − 7 =