
यवतमाळ – मराठा आरक्षणाचा अध्यादेश जाहीर करा या मागणीसाठी मराठा समाज बांधवानी उमरखेड येथील उपविभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी टावरवर चढून विरूगीरी केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
उमरखेड व महागाव येथील समाजबांधवाचा सहभाग असलेल्या मोर्चाचे उपविभागीय कार्यालयासमोर सभेचे रुपांतर झाले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गुणवंत सुर्यवंशी, संदिप घाडगे, राम कदम, धर्मराज अमृते, पवन कदम व अन्य कार्यकर्ते उपविभागीय अधिकारी कार्यालयातील बिएसएनएलच्या टॉवरवर चढले. त्यांनी तेथून मराठा आरक्षण घेतल्या शिवाय सोडणार नाही अशा घोषणा दिल्या. त्यामुळे तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी चितांगराव कदम हे होते. यावेळी माजी आमदार अॅड. अनंत देवसरकर, प्रकाश पाटील देवसरकर, तातू देशमुख, राम देवसरकर, अॅड. माधव माने, जगदिश नरवाडे, सिताराम ठाकरे, विकास चव्हाण, भिमराव चंद्रवशी, श्विाजी माने, डॉ. वंदना मरसुरकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी सवनेकर, दत्तराव शिंदे, माजी आमदार विजय खडसे, संभाजी नरवाडे, वि.ना. कदम, ज्योती ठेंगे, शिला कदम, प्रा. नलीनी टकरेख् सरोज देशमुख, प्र.भा. काळे, अॅड. अनिल माने, संजय जाधव, रणजीत नलावडे, युवराज देवसरकर, विनायक कदम, अॅड. बीराम मुरकुळे, शाम सुरोशे, वसंत देशमुख, सुदर्शन कदम यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.









