
मराठी सिनेमा ग्लोबलाईझ झाल्यापासून बॉलीवूडमधील अनेक चांगले कलाकार मराठी सिनेमाच्या वाटेवर येताना दिसत आहेत. याच कलाकारांपैकी एक कलाकार एका आगामी मराठी सिनेमामध्ये दिसणार आहे ती म्हणजे अभिनेत्री तिस्का चोप्रा. अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये आपल्या बोल्ड अवतारामुळे आणि वेगवेगळ्या भूमिकांमुळे तिस्का चांगलीच लोकप्रिय झाली आहे. आता तिस्का मराठी पडद्यावर आपली जादू चालवणार आहे. ‘वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ या गाजलेल्या सिनेमांची जोडी म्हणजेच दिग्दर्शक उमेश कुलकर्णी आणि राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेता-लेखक गिरीश कुलकर्णी एका नवीन सिनेमासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. ‘हायवे’ असे या सिनेमाचे टायटल असून यातच अभिनेत्री तिस्का चोप्रा भूमिका करणार आहे. हिंदी ‘काकस्पर्श’मध्येही रोल ‘काकस्पर्श’ या सिनेमाला दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर हे हिंदीत तयार करीत असून मराठी ‘काकस्पर्श’मध्ये मेधा मांजरेकर यांनी साकारलेली भूमिका तिस्का चोप्रा करणार आहे.









