
यवतमाळ – आठवड्यात पुन्हा तिसºयांदा वादळी पावसाने जिल्ह्यात तडाखा दिला असून आज पुसद, महागाव तालुक्यात गारपीट झाली. तर यवतमाळ, आर्णी, दिग्रस, घाटंजी, दारव्हा,कळंब तालुक्यात पाऊस कोसळला. गेल्या काही दिवसापासून वातावरणात बदल निर्माण झाला आहे. तीनदिवसापूर्वी जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपून काढले होते. आज पुन्हा काही तालुक्यात वादळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेकडो हेक्टरवरील पिके भूईसपाट झाली आहे. तर काही ठिकाणी वीजेचे खांब कोसळल्याची माहिती आहे. यवतमाळात ढग दाटून आल्यानंतर ५ वाजता मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली.
महागाव: तालुक्यात वादळी वाºयासह जोरदार गारपीट झाली. सेनद येथे पाच वाजता वादळ वाºयासह झालेल्या गारपीटीमुळे शेतमालाचे नुकसान झाले. तर काही घरावरील टिनपत्रे उडून गेल्याने यात एक महिला जखमी झाली. दुपारी ३ वाजतापासून ढग दाटून आले होते. माळकिन्ही, गुंज, सवना, खडका, माळेगाव, वडद, खांबलवाडी, कापरवाडी, बोरी,शाहीइजार, काळी (दौ.)आदी ठिकाणी गारपीट झाली. वादळवाºयासह आलेल्या गारपीटीमुळे गहू, हरभरा पिक पूर्णत: उद्ध्वस्त झाले. काळी (दौ.)जिल्हा परिषद सर्कलमध्ये गारपीटीमुळे गहू, हरबरा पिकासंह संत्रापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तर अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडून गेले.
पुसद : तालुक्यात दुपारी ४ वाजता वादळी वाºयासह आलेल्या गारपीटीमुळे शेतपिकांसह घरांचे नुकसान झाले. अचानक ढग दाटून आल्यानंतर वादळवाºयासह गारपीटीला सुरूवात झाली. शेतात असलेला गहू, हरबरापिक भूईसपाट झाले आहे. काही ठिकाणचा वीज पुरवठाही वादळीपावसामुळे खंडीत झाला. सोबतच पांढरकवडा, घाटंजी, आर्णी, कळंब, दिग्रस, दारव्हा, बाभूळगाव तालुक्यातही पावसाच्या सरी कोसळल्या. रब्बी हंगामात गहू, हरभरा पिक उभे असून या अवकाळी पावसामुळे तोंडात आलेला घास हिरावल्या जात असल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे.









