महानायक अमिताभ बच्चन यांना यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्कार

biggb
मुंबई- महानायक अमिताभ बच्चन यांना यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मुंबईत झालेल्या एका शानदार सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी अमिताभ यांना हा पुरस्कार प्रदान केला.
दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह व सुवर्ण कडे असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. गेल्यावर्षी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. अमिताभ यांना पुरस्कार प्रदान केल्यानंतर राज्यपालांनी मुक्तकंठाने बच्चन यांचे कौतुक केले. ‘केवळ उत्कृष्ट अभिनयाकरिता लोक अमिताभ बच्चन यांना मानत नाहीत; तर त्यासोबतच अमिताभ यांचे वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातील आचरण, लोकांप्रती त्यांच्या मनात असलेला आदरभाव, त्यांची सामाजिक बांधिलकी व नम्र स्वभाव या गुणांमुळेच ते लोकप्रिय आहेत. चारित्र्य, संस्कृती व गुणवत्तेमुळे अमिताभ बच्चन यांनी करोडो लोकांची मने जिंकली आहेत, असे उद्गार राज्यपालांनी काढले.
या सोहळ्याला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार वेणुगोपाल धूत, सुब्बरामी रेड्डी, जयाप्रदा, पामेला यश चोप्रा, सिमी गरेवाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


4 + = thirteen