
यवतमाळ – बुध्दांच्या काळात आणि आजही सामाजिक समतेच्या प्रस्थापनेसाठी तथागत बुध्दांच्या धम्म अत्यंत उपयुक्त ठरत आहे. यातून सामाजिक लोकशाहीची बीजे बुध्दाच्या करुणा व मैत्री असलेल्या धम्मातून जगात आकाराला आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे मी आज खासदार होऊ शकले. या महामानवामुळे आज महिलांना मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. असे विचार खा. भावना गवळी यांनी व्यक्त केले. त्या दारव्हा येथील लाख खिंड येथे मंगळवारी आयोजित बैध्द धम्म परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या.
दि. बुध्दीस्ट सोसायटी आॅफ इंडीयाच्या वतीन २५ व २६ फेब्रुवारी या दोन दिवसासाठी बौध्द धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुखदेव बोरकर, जयकृष्ण बोरकर, सुखदेव जाधव हे होते. तर प्रमुख उपस्थित म्हणून भावना गवळी, सरपंच सविता वानखडे, पंडीत राठोड, वसंत रामटेके, श्रीरंग वानखेडे, नामदेव वासनीक, कमल बोडखे, नाना सावळे, भगवान मुंधाने, देवराव पाटील, धनपाल मेश्राम, देवीदास वानखडे उपस्थित होते. यावेळी भद्ंत विपसी थेरो भिक्खूंनी बुध्दकन्या धम्मपाल माने, अमर दिपकार, आदिनीं मार्गदर्शन केले. प्रास्ताविक बाळा गडलींग यांनी केले. संचालन भिमराव वानखडे आणि आभार अमोल तायडे यांनी मानले.









