महाराष्ट्रात मतदान

images.jpeg2

मुंबई –  लोकसभा निवडणुकीचा महासंग्राम ७ एप्रिलपासून सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रात तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. १० एप्रिल, १७ एप्रिल आणि २४ एप्रिलला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये मतदान होईल. त्याचं सविस्तर वेळापत्रक पुढीलप्रमाणेः
गुरुवार, १० एप्रिल २०१४
दहा मतदारसंघ
बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
गुरुवार, १७ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
हिंगोली, नांदेड, परभणी, मावळ, पुणे, बारामती, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
गुरुवार २४ एप्रिल २०१४
१९ मतदारसंघ
नंदुरबार, धुळे, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, उत्तर मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, रायगड.
विधानसभा पोटनिवडणूक १० एप्रिलला
वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूक १० एप्रिलला घ्यायचं निवडणूक आयोगानं निश्चित केलं आहे. या मतदारसंघाचे काँग्रेस आमदार सुभाष झनक यांचं गेल्या वर्षी २८ ऑक्टोबरला निधन झालं होतं. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ five = 14