महिला अत्याचारांत महाराष्ट्र पहिला

Rape

नवी दिल्ली – पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य अशी ओळख सांगणाऱ्या महाराष्ट्राची मान शरमेनं खाली जाईल, अशी आणखी एक माहिती समोर आली आहे. ‘गेल्या वर्षभरात बलात्कार व महिलांवरील अत्याचारांच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत,’ असं केंद्रीय महिला व बालकल्याणमंत्री मनेका गांधी यांनी आज लोकसभेत सांगितलं.
महिलांवरील अत्याचाराची माहिती देताना त्या बोलत होत्या. ‘महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार दिवसागणिक वाढतच आहेत, अशी कबुली देतानाच, ‘महिलांच्या सुरक्षेला सरकारचे पहिले प्राधान्य आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी महिलांवरील अत्याचाराची आकडेवारीच दिली. त्यानुसार देशभरात गेल्या वर्षात बलात्कार व महिलांवरील हल्ल्यांच्या एकूण १,१७,०३५ घटना घडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक १३,८२७ तक्रारींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. त्या खालोखाल मध्य प्रदेश १३,३२३ तर, आंध्र प्रदेशात १३,२६७ तक्रारी दाखल झाल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 + nine =