महिलेचा मृतदेह आढळला

महिलेचा मृतदेह आढळला
घातपाताची शक्यता
पांढरकवडा – पाटणबोरी येथील शर्मा नगरातील महिलेचा स्वत:च्या घरामागेच रक्ताच्या थारोळ््यात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली असून घातपात झाल्याची चर्चा आहे.
वाणी सुभाष गांजुलवार (३०) रा. शर्मा नगर असे मृतकचे नाव आहे. तीचे पती सुभाष खुशाल गांगुलवार (३५) हे राजीव विद्यालय कारेगाव पारंबा येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सुभाष व वाणी ह्यांचा विवाह ११ वर्षापूर्वी झाला असून मृतकचे माहेर पाटण येथील आईटवार कुटुंबात आहे. दरम्यान आज सकाळी स्वत:च्या घरामागेच रक्ताच्या थारोळ््यात या महिलेचा मृतदेह आढळला. या महिलेला सकाळी घरी काम करतांना शेजारच्यांनी पाहिले असून सकाळी ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान ही घटना घडल्याची शक्यता आहे. या घटनेची माहिती मिळताच पाटणबोरी चौकी व पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला असून घातपात झाल्याची शक्यता वर्तवली आहे. गांजुलवार यांना १० वर्षाची मुलगी व ८ वर्षाचा मुलगा असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली असून हळहळ व्यकत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


three + = 5