यवतमाळ – दाते कॉजेलचौकातून पायी जाणाºया महिलेच्या गळ््यातील मंगळसूत्र उडविल्याची घटना आज दुपारी १२.१५ वाजता घडली. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
कशिश सुशिल कटीयारा (२७) रा. वैद्य नगर यांनी शाळेतून मुलीला घेऊन घराकडे जात होत्या. अशातच दाते कॉजेल चौकात समोरुन आलेल्या युवकाने या महिलेच्या गळ््यातील साडेबारा ग्रॅमचे मंगळसूत्र हिस्कावले. यावेळी सदर महिलेने आरडा ओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी पाठलाग करुन मंगळसूत्र चोरट्यास पकडले. या बाबतची माहिती प्रा. मेहरे यांनी वाहतुक पोलीस सुरेंद्र वासनिक यांना दिली. त्यांनी घटनास्थळ गाठून चोरट्यास ताब्यात घेऊन वडगाव रोड पोलिसांच्या स्वाधिन केले. यावेळी घटनास्थळावर सहा ग्रॅम सोन्याचा तुकडा सापडला. याप्रकरणी कशिश कटीयारा यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.










